सारस्वत

वैशाली चौथाई-आठवले

अभिवादन घे त्रिवार तुजला शाकुंतलच्या निर्मात्या |

मालविकाग्निमित्र नाट्यही सज्ज तुझे रे गुण गाया ||

पुरूरवा आणि उर्वशी यांची प्रेम कथा खुलवी प्रतिभा |

ऋतुसंहारी सहा ऋतूंची विलसतसे अति दिव्य प्रभा ||

मेघदूत संदेश देतसे

यक्षाचा त्या रमणीला |

कुमार संभव होई कसा

त्या सांबसदाशिव -गौरीला ||

रघु राजाचा वंश पराक्रमी

अजानुबाहू रामाचा |

या सर्वांच्या रचनाकारा

 मुजरा तुजला मानाचा ||

शृंगाराचा विलास परी तू

अजविलापही रंगविसी |

अनामिकेला सार्थ ठरविसी

तुलना तुझी ना कोणाशी ||

सप्त कृतींचे इंद्रधनू

या साहित्याच्या नभांगणी |

सारस्वत कालीदासा ,

प्रार्थिते बहरूदे मम वाणी ||

वैशाली चौथाई-आठवले, बदलापूर.

परिचय

संस्कृत बीए, बीएड.

1999 पासून आई ,ए,एस कात्रप विद्यालय ,बदलापूर येथे संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत.

संस्कृत विषयाची, साहित्याची आवड.

 शाळेत दर वर्षी संस्कृत दिन, महाकवी कालिदास दिन, आयोजित करते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*