समर्पणम् वार्षिक अंकासाठी लेख पाठविण्याचे आवाहन.

डॉ. सौ. आशा गुर्जर यांचे गायत्री साहित्य या प्रकाशनातर्फे समर्पणम् हा वार्षिक संस्कृत अंक डॉ. ग. बा. पळसुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली पंधरा वर्षे प्रकाशित होत आहे.

यावर्षीच्या वार्षिक अंकासाठी कोरोना किंवा कोविड या जागतिक संकटाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संस्कृत लेखन अपेक्षित आहे.

यासाठी पुढील विविध क्षेत्रातील मुद्दे सुचवण्यात आले आहेत.

१. जागतिक परिस्थिती आणि भारतातील परिस्थिती यांच्यातील तुलना आणि भारताचे स्थान, भारताची उजळलेली प्रतिमा

२.कोरोनाचा शैक्षणिक क्षेत्रावरील परिणाम, भारतात शैक्षणिक क्षेत्रातील समस्या, परिवर्तन, गुरु-शिष्य परंपरा व संबंधामधले बदल

३. भारतीय जीवन पद्धती, संस्कार, संस्कृती यांचा या संकटावर मात करण्यास कसा लाभ झाला?

४. आर्थिक क्षेत्रांमधील परिणाम, उद्योग, व्यापार, शेती या मध्ये झालेले परिवर्तन

५. पैशांचे महत्व आणि साधी राहणी, गरजा कमी करणे यांचे महत्त्व

६. सेवाधर्म: परमगहन:!

७. दाता भवति वा न वा!

८. राम जन्मभूमि निधी उभारणी सारखे राष्ट्रीय उपक्रम

९. राजकीय क्षेत्र आणि निवडणुका

१०. न्यायालयांची भूमिका

११. कौटुंबिक क्षेत्र – कौटुंबिक हिंसाचार, गृहगत समस्या आणि निवारण, कौटुंबिक साहचर्य

१२. सामाजिक क्षेत्र परस्पर नातेसंबंध, भावविश्व

१३. लसीकरणाविषयीची भूमिका

१४. नागरी आणि ग्रामीण जीवनावरील परिणाम, खेड्यांकडे चला..

१५. विज्ञान आणि औषधशास्त्र यातील प्रगती, पर्यायी औषधयोजनेचा विचार ..
homeopathy , Ayurveda etc..

१६. व्यसनाधीनता, घरपोच मद्य सेवा, महाराष्ट्र की मद्यराष्ट्र?

१७. धार्मिक रूढी, परंपरा, विधी, कुळाचार, उत्सव, सोहळे, विवाह सोहळा, अंत्यसंस्कार यांच्यातील परिवर्तन

१८. साहित्य, संगीत, चित्रपट, कला, क्रीडा या क्षेत्रांमधील परिवर्तन

१९. दळणवळण सुविधा, पर्यटन, पर्यावरण यांवरील परिणाम

२०. मानसिक स्थित्यंतरे, अंतर्मुखता

२१. संचार बंदी मुळे बंद असलेल्या अनेक गोष्टी आवश्यक की अनावश्यक याची झालेली जाणीव

२२. मानवता, सहकार्य, परोपकार यांचे दर्शन, सकारात्मक स्वानुभव

२३. तंत्रज्ञानाचा वाढता वापर, त्याचे फायदे आणि वर्क फ्रॉम होम च्या समस्या

२४. संस्कृत विश्व मध्ये झालेले बदल

२५. कोरोनाचे बळी झालेल्या विविध क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींना श्रद्धांजली

२६. कोरोना आणि विनोद

२७. कोरोनाचे भविष्य – कोरोना संपेल का?

२८. कोरोना आणि सृजनशीलता क्रिएटिव्हिटी

२९. कोरोना आणि मृत्यूचे भय

याशिवाय
संस्कृत मध्ये निबंध, लेख, कथा, विनोद, स्तोत्र, कविता मागविण्यात येत आहेत.

शब्द मर्यादा – ५०० ते ७००
लेख पाठवण्यासाठी अंतिम तारीख – ३१ ऑगस्ट २०२१

कृपया आपण कोणत्या विषयावर लेखन करू इच्छिता हे आम्हाला लवकरात लवकर अवश्य कळवावे. 🙏

संपर्क क्रमांक –

डॉ. सौ. आशा गुर्जर
8080300388

सौ. तरंगिणी खोत
8692988864

श्रुती कानिटकर
7208011198

डॉ. सौ. माधवी दिपक जोशी
9975165842

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*