सौ. श्रावणी मंदार माईणकर या 2017 साली मुंबई विद्यापीठातून ‘अधिस्नातक संस्कृत’ (M.A.) ही परीक्षा विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्या असून त्यांचा संस्कृतचा प्रवास त्या आधीपासूनच सुरु झाला आहे. त्या 2013 साली ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘Certificate course in Sanskrut’ हा अभ्यासक्रम विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी 2014 साली ‘मुंबई विद्यापीठातूनच’ ‘Diploma Course in Sanskrut’ हा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यात द्वितीय क्रमांक मिळवला. याच वर्षी म्हणजे 2014 साली ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी-संस्कृत केंद्र’ यांच्यातर्फे घेण्यात आलेले ‘संस्कृत भाषा अध्यापन अभ्यासक्रम’ ( पायाभूत आणि प्रगत वर्ग) त्या ‘प्रगत प्रथम श्रेणी’मध्ये उत्तीर्ण झाल्या. 2015 साली मुंबई विद्यापीठातून ‘Advance Diploma Course in Sanskrut’ या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत त्या तिसर्‍या आल्या होत्या. अ़जूनही त्यांची संस्कृतविषय्क ज्ञानलालसा संपलेली नाही. सध्या त्यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘संस्कृत विशारद’ या अभ्यासक्रमाचे अध्ययन चालू आहे.

मूळच्या बी. कॉम असलेल्या श्रावणी माईणकर यांनी Davar’s Secreterial College, Fort मधून ‘Personal Secretary’ चा Diploma केला. त्यानंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, माटुंगा’ मधून ‘Post Graduate Diploma in Human Resourse Management ची परीक्षा त्या विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्या. अनेक वर्षे Pharmaceutical Industry मध्ये कार्यरत असताना त्यांना आपल्या आवडीच्या संस्कृत क्षेत्रात यावेसे वाटले. आणि त्यांनी मुंबई विद्यापिठात प्रवेश घेतला. शालेय जीवनापासूनच त्यांना संस्कृतची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण करीत असताना ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या’ ‘संस्कृत’ विषयाच्या अनेक परीक्षा विशेष  प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्यानंतर S.S.C. ला ‘संपूर्ण संस्कृत’ हया विषयाची निवड करून त्यांनी त्या विषयात 97/100 गुणांची प्राप्ती केली.

श्रावणी माईणकर यांनी खरं तर 2012 पासूनच ‘शालेय संस्कृत विशेष वर्ग’ चालवून संस्कृत विषयाचे अध्यापन सुरु केले. पण पुढे मुंबई विद्यापिठातून ‘अधिस्नातक संस्कृत’ (M.A.) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सध्या त्या विलेपार्ले- मुंबई येथे ज्ञानप्रभा संस्था-अंधेरी यांच्यावतीने साठ्ये महाविद्यालय-विलेपार्ले (पू) येथे घेण्यात येणार्या संस्कृत प्रशिक्षण वर्गांमध्ये अध्यापन करीत आहेत. शिवाय साठे महाविद्यालयातच त्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही संस्कृत शिकवतात. वृत्तवल्लरीची जबाबदारी त्यांनी सेवावृत्तीने स्विकारली असून या संकेतस्थळाचा वापर त्या संस्कृतप्रसारासाठी जास्तीत जास्त व्हावा यासाठी सात्यत्याने प्रयत्नशील असतात.

shravanimainkar@gmail.com

Mobile No. 9920986543