महाकवि-कालिदासदिननिमित्तम्…

राजेंद्र भावे

आषाढस्य प्रथमदिवसे स्मर्यते कालिदासः।

साहित्यर्तावनुपमसुमं यस्य गन्धो मनोज्ञः।।

यत्साहित्यं, कुसुमकिसलाः विश्वमामोदयन् ये ।

तं वन्देऽहं कविकुलगुरुं शारदायाः सुपुत्रम्।।

– अर्थ- आषाढाच्या पहिल्या दिवशी आपण कालिदासाचं स्मरण करतो.. हा कालिदास जणु, साहित्याच्या ऋतूतील एक अनुपम असं पुष्प आहे की, ज्याचा सुगंध चेतोहर आहे..ज्याचे असंख्य परागकण म्हणजे त्याच्या विविध साहित्य रचना आहेत..की ज्यांचा परिमल संपूर्ण विश्वात पसरलाय… अशा त्या सरस्वतीपुत्र कविकुलगुरु कालिदासाला मी नमस्कार करतो

– रचना- राजेंद्र भावे -प्रातिभेयः

राजेंद्र भावे

 निवृत्त कार्यकारी अभियंता(स्थापत्य), म.रा.वि.मं.

व शास्त्रीय व्हायोलिन वादक

व्हाॅयलिनवादनाचे देशविदेशात व आकाशवाणी/दूरदर्शनवर कार्यक्रम

संस्कृतचे शिक्षण – आई कै.श्रीमती प्रतिभा भावे व गुरू कै.पं.शंकरशास्त्री आर्वीकर आणि पं.विनायकशास्त्री आर्वीकर, नागपूर.

वयाच्या १५व्या वर्षापासून संस्कृत-काव्यरचना करण्यास सुरवात

विविध विषयांवर संस्कृत कविता, चतुरावली, श्लोक, सुभाषितं, मंगलाष्टके रचली आहेत

संगीत-मर्मज्ञ कै.डॉ.अशोक रानडे, व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार आणि नटवर्य कै.भालचंद्र पेंढारकर यांना संस्कृत-मानपत्र अर्पण.

“चंदामामा” या प्रसिद्ध कथा-मासिकातिल अनेक कथांचे संस्कृतानुवाद केले आहेत

J.J school of Arts साठी संस्कृत ब्रीद वाक्य(श्लोक) तयार करून दिला (चित्रकर्मसु भूषणम्)

K.J Somaiyya संस्कृत विद्यापीठात २०१५ आणि २०१६ च्या संस्कृत-कवि सम्मेलनात कवी म्हणून सहभाग

DD News वाहिनी वर देशातील पहिल्या संस्कृत वृत्तपत्रिका – वार्तावली तर्फे राष्ट्रिय स्तरावर ‘हिंदी से संस्कृत’ अनुवाद स्पर्धेत “आजा सनम मधुर चांदनी में हम” या हिंदी गीताच्या पहिल्या गेय अनुवादासाठी संपूर्ण देशातून आलेल्या २५ स्पर्धकांतून “विजेता”.घोषित.(पहिलं गीत)

या अनुवादस्पर्धेत आतापर्यंत १६ वेळा राष्ट्रिय स्तरावर पारितोषिक प्राप्त.

या अनुवादासाठी sbs.radio channel Austrelia वर सपत्नीक मुलाखत.

तसेच.. आजा सनम… च्या अनुवादामुळे जयपुर-डेली या वृत्तपत्रात मुलाखत…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*